Sunday, January 7, 2018

Pimpalpan


 कधि असाच वहीमध्ये पिंपळाचं पान दिसावं 
अन पानांच्या जाळ्यांमधे चट्कन मन गुंताव  

तो नदीकाठी पसरलेला छोटासा गाव  
अन वेशीवर रंगलेला पत्त्यांचा डाव 

ते अंगणात सांडलेले बकुळीचे तारे 
अन तिन्हीसांजेचे मंद धुंद वारे 

ती शिशिरातली सावली मुग्ध रात 
अन निळ्या चांदण्यात धरलेला तुझा हात 

पण आता वेशीवरला गावही विस्कटलाय 
अन मांडलेला पत्त्यांचा डावही मोडलाय 

अंगणात वाढलेला बकुळही सुकलाय 
अन हातात घेतलेला तुझा हातही सुटलाय 

आता ... आता सगळं सरलंय 
पिंपळाचं पान मात्र अजूनही माझ्या वहीत उरलंय !!



Pimpalpan

 कधि असाच वहीमध्ये पिंपळाचं पान दिसावं  अन पानांच्या जाळ्यांमधे चट्कन मन गुंताव   तो नदीकाठी पसरलेला छोटासा गाव   अन वे...