कधि असाच वहीमध्ये पिंपळाचं पान दिसावं
अन पानांच्या जाळ्यांमधे चट्कन मन गुंताव
तो नदीकाठी पसरलेला छोटासा गाव
अन वेशीवर रंगलेला पत्त्यांचा डाव
ते अंगणात सांडलेले बकुळीचे तारे
अन तिन्हीसांजेचे मंद धुंद वारे
ती शिशिरातली सावली मुग्ध रात
अन निळ्या चांदण्यात धरलेला तुझा हात
पण आता वेशीवरला गावही विस्कटलाय
अन मांडलेला पत्त्यांचा डावही मोडलाय
अंगणात वाढलेला बकुळही सुकलाय
अन हातात घेतलेला तुझा हातही सुटलाय
आता ... आता सगळं सरलंय
पिंपळाचं पान मात्र अजूनही माझ्या वहीत उरलंय !!

No comments:
Post a Comment